Monday 3 August 2015

तेरी मेरी यारी

श्री 
जुन  १९९७ मध्ये एस पी कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात माझी आणि ईश्वराची ओळख अकरावीच्या वर्गात झाली. नवीन रुटीन कसं  असेल ? कसे मित्र मैत्रिणी भेटतील ? असाच विचार मनात असताना सहजच ईश्वराची माझी ओळख झाली, ती दोघींच्या मनमोकळ्या स्वभावामुळे. मग काय रोज कॉलेजला भेटलो कि मजा करायचो. स्वभाव जुळले, विचार जुळले. हळुहळू एकमेकांचं प्रतिबिंबच झालो. 

पुढे कॉलेज संपलं, लग्न  झाली, मुलं झाली तरी तेव्हाची मैत्रीची विण  घट्टच आहे. गेली आठ नऊ वर्ष ती परदेशात आहे पण लांब आहे असा वाटतच नाही. अजुनही सर्व गोष्टी पुर्वी  सारख्याच शेअर करतो, मग तो आनंद असो वा दुःख. गणपतीत तर तीची उणीव मला फार भासते. अजुनही एस एस चा  वडापाव आठवुन तासन तास बोलतो आम्ही. कॉलेजच्या सुट्टीत पुण्यातल्या पुण्यात पत्रं  लिहायचो ते आठवलं  कि हसू येतं.  ती पुण्यात आली कि एक एक संद्याकाळी फक्त माझी असते. आम्ही देहानं  लांब असलो तरी मनानं आधी सारखाच जवळ आहोत. 

आमच्या आयुष्यात एकमेकींच्या आठवणींचा एक कप्पाच आहे जो सतत अपडेट होत राहील. हि आमच्या मैत्रीची ठेव आज पर्यंत जतन केली तशीच  अनंत काळ राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आज मी म्हणेन "'तेरी मेरी यारी, मुझे जान से है प्यारी "

तुझीच रुपाली 
मे २०१५








No comments:

Post a Comment